
बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खाननंतर आता अभिनेत्री स्वरा भास्करला (Swara Bhaskar) धमकीचं पत्र मिळाल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीला आपल्या मुंबईमधील वर्सोवा येथील राहत्या घरी हे पत्र मिळालं आहे. अभिनेत्रीने त्वरित पोलिसांमध्ये धाव घेत अज्ञात व्यक्ती विरोधात दखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री स्वरा भास्करला एक धमकीचे पत्र मिळाले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत विधान केल्याने अभिनेत्रीला हे पत्र मिळाल्याचं सांगितलं जात आहे. या पत्रामध्ये लिहण्यात आलं आहे, ‘देशातील युवक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाहीत.. आपण फक्त आपल्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करावं.असं म्हणत या पत्रामध्ये आणखी काही आपत्तिजनक मजकूर लिहण्यात आला आहे. पत्राच्या शेवटी देशाचा युवक अशी स्वाक्षरी करण्यात आली आहे.
अभिनेत्री स्वरा भास्करने 2017 मध्ये सावरकरांबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यांनतर सोशल मीडियावर बराच वाद देखील निर्माण झाला होता.