
सनी लिओनीसोबत चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला आहे. अभिनेत्रीच्या पायाला दुखापत झाली आहे. सध्या सनी लिओन तिच्या साऊथ सिनेमा ‘ओ माय घोस्ट’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्रीचा हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ओ माय घोस्टच्या सेटवर झालेल्या दुखापतीची माहिती खुद्द सनी लिओनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
चित्रपटाच्या सेटवर दुखापत झाल्यानंतर सनी लिओनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिच्या पायाला दुखापत झालेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये सनी लिओन तिच्या चित्रपटातील ड्रेस आणि मेकअपमध्ये दिसत आहे. तिच्या पायाच्या बोटातून रक्त येत असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram