अभिनेत्री Sowmya Janu ने भर रस्त्यात गाडी उभी करून केला ‘फुल टू राडा’, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

तेलगू अभिनेत्री सौम्या जानूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक होमगार्डला मारहाण केल्याचा आरोप तिच्यावर झाला आहे. याप्रकरणी संबंधित संपूर्ण घटना तिथे तिथे असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली. हे प्रकरण हैदराबादच्या बंजारा हिल्स येथे घडले. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी अभिनेत्रीवर कारवाईची मागणी केली केली असून तिच्यावर जोरदार टिकाही होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी समोर आली. बंजारा हिल्स या ठिकाणी चुकीच्या रस्त्यावर आपली जॅग्वार कार चालवत असलेल्या अभिनेत्री सौम्या जानूला ट्रॅफिक होमगार्डने अडवले. व्हिडिओवरील टाइमस्टॅम्पनुसार, शनिवारी, 24 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजून 24मिनिटांच्या सुमारास हा गोंधळ झाला. होमगार्डने अडवताच त्यांचे म्हणणे ऐकण्याऐवजी किंवा त्यांना सहकार्य करण्याऐवजी, सौम्या जानू उलटी त्यांच्यावरच भडकली. आपल्या मार्गात अडथळा आणल्याबद्दल गार्डला शिवीगाळ तिने सुरु केली. होमगार्डशी फार उद्धटपणे बोलू लागली.

सौम्याने गार्डचे कपडे फाडले
तेथे उपस्थित लोकांनी सांगितले की, या प्रकरणात हस्तक्षेप करूनही अभिनेत्री शांत झाली नाही. ती मोठमोठ्याने ओरडत राहिली आणि गोंधळ घातला. यातच भर म्हणून की काय जेव्हा प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे होमगार्डच्या लक्षात आले तेव्हा त्याने व्हिडिओ बनवायला घेतला तर तिने या त्या ट्रॅफिक होमगार्डवर हल्ला केला, सौम्याने होमगार्डचे कपडे फाडले आणि त्याचा फोनही हिसकावला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sowmya Janu (@sowmyajanu_official)

या प्रकारानंतर, ट्रॅफिक होमगार्डने बंजारा हिल्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुरावा म्हणून त्यांनी रेकॉर्ड केलेला व्हिडिओही ही दाखवला. पोलिसांनी अभिनेत्री विरोधात गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी सौम्या जानूवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.