
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये ऋतुजा बागवे हिचा देखील समावेश होतो. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमात काम करत ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. अभिनयाबरोबरच ऋतुजा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ऋतुजा तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या घडामोडी ती चाहत्यांना सांगत असते. नुकतीच तिने एक आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.
अभिनेत्री ऋतुजा बागवे हिचा काल वाढदिवस झाला. या वाढदिवसानिमित्त तिने केलेली पोस्ट ही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या वाढदिवसाला तिने स्वतःलाच एक मोठी भेट दिली आहे. ती म्हणजे, तिने स्वतःचं पहिलं घर घेतलं आहे. काल त्या घरी ती तिच्या कुटुंबियांसोबत गेली होती. त्यावेळचे काही फोटो तिने पोस्ट करत तिला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे तिने आभार मानले आहेत.
View this post on Instagram
हे फोटो पोस्ट करत तिने लिहिले, “स्वतःचं घर. हॅप्पी बर्थडे टू मी. ही माझी माझ्या घराला दिलेली पहिली भेट. जेव्हा लोक विचारतात की, वय झालंय लग्न कधी करणार? तेव्हा माझी आई म्हणाली, वय झालं म्हणून नाही तुला जेव्हा करावास वाटेल तेव्हा लग्न पण. पण त्या आधी स्वावलंबी हो, स्वतःचं घर घे. आई हे स्वप्न तू मला दाखवलस त्याबद्दल तुझे खूप आभार. मला माहित असलेली तू सर्वात कणखर व्यक्ती आहेस.
बाबा तुमच्या शिवाय हे शक्य झालं नसतं. आईने स्वप्न दाखवल पण तुम्ही पाठीशी होतात म्हणून घेतली उडी. तुम्ही बापमाणूस आहात. भौतिक गोष्टित मी यश नाही मानात ना समाधान शोधत पण तूमचं स्वप्न पूर्ण करु शकले ह्याचा आनंद खुप आहे, जो मी शब्दात नाही मांडू शकत. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमानाने पाणावलेले डोळे मला मेहनत घेऊन काम करण्यासाठी शक्ती देतात. मी खरोखर भाग्यवान आहे कारण तुम्ही माझे आई वडील आहात. असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.