Rakhi Sawant: अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांकडून अटक

WhatsApp Group

मुंबई पोलिसांकडून अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant) अटक करण्यात आली आहे. पोलीस राखी सावंतला अंधेरी न्यायालयामध्ये हजर करणार आहेत. आंबोली पोलिसांकडून राखीला अटक करण्यात आली आहे. राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला होता.

गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबतचे तिच्या लग्नाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. आपण सात महिन्यांपूर्वी लग्न केलं असं देखील तिनं कबुल केलं होतं. मात्र आदिलने सुरुवातीला हे लग्न स्वीकारण्यात नकार दिला होता.जगातील सर्वात चांगली नोकरी; 23 जानेवारीपर्यंत फॉर्म भरा, पगार 40 लाख रुपये दरमहा

शर्लिन चोप्राने ट्विटरवर माहिती दिली
राखी सावंतला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती शर्लिन चोप्राने ट्विटरवर शेअर केली आहे. तिने ट्विट केले की, “आंबोली पोलिसांनी राखी सावंतला एफआयआर क्रमांक 883/2022 संदर्भात अटक केली आहे. राखी सावंतचा ABA 1870/2022 काल मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला.