
गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत ‘रानबाजार’ या वेबसिरीजची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित झाला होता. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसीरिजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित पाहायला मिळत आहे.
रानबाजार या वेबसीरिज यात प्राजक्ताचा खूप बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. यावरुन प्राजक्ताला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी यावरुन तिच्यावर टीका केली आहे. तिच्या या वेबसीरिजमधील बोल्ड दृश्यांमुळे तिला ट्रोल केलं जात आहे. मात्र नुकतंच प्राजक्ताने यावर भाष्य केले आहे.
प्राजक्ताने या वेबसीरिजचा टीझर शेअर करत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात ती म्हणाली की, “प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहीतरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.)”
View this post on Instagram
“पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न. माझ्यातल्या अभिनेत्रीवर विश्वास ठेवून माझ्या पदरी ही भूमिका टाकल्याबद्दल अभिजित पानसे व मराठीतील सगळ्यात मोठी वेबसीरीज बनवल्याबद्दल प्लॅनेट मराठी, अक्षय बर्दापूरकर यांचे आभार.”
प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत एक टीझर ही पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असून ती व्हायरल होत आहे.