मनोरंजन विश्वात खळबळ; अभिनेत्री निकिता नायरचं वयाच्या 21व्या वर्षी निधन

WhatsApp Group

‘मरिकुंडोरू कुंजडू’ चित्रपटातील बालकलाकार निकिता नायरचे निधन झाले. ती २१ वर्षांची होती. निकिता बी.एससी. मानसशास्त्राची विद्यार्थिनी होती. कोची येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. तिला विल्सन डिसीज नावाचा एक दुर्मिळ आजार होता.

निकिता नायर ही कोल्लममधील करुणागप्पल्ली येथील रहिवासी होती. आजारपणामुळे त्यांना दोनदा यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करावी लागली. दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर एका आठवड्याने तिचे निधन झाले.