कॉलेजच्या दिवसात मृणाल ठाकूरला यायचा आत्महत्येचा विचार, म्हणाली मला ट्रेनमधून मारायची होती उडी

WhatsApp Group

मृणाल ठाकूर mrunal Thakur ही टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आता मृणालने बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण कोणत्याही कलाकारासाठी कोणत्याही इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवणे हे खूप अवघड काम असते. आता मृणालने आपल्या संघर्षाबद्दल खुलासा केला आहे.

मृणालने लहानपणी आत्महत्येचा विचार कसा करायचा हे सांगितले. एका मुलाखतीत मृणालने सांगितले की, तिने डेंटिस्ट व्हावे अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. पण मृणालला पत्रकारितेत रस होता. तिला काहीतरी करायचं होतं जेणेकरून ती टीव्हीवर दिसावी.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)


यूट्यूबर रणवीर अल्लाबदियाशी झालेल्या मुलाखतीत मृणाल म्हणाली, ‘तेव्हा अनेक जबाबदाऱ्या होत्या. त्यावेळी मला वाटायचे की मी चांगले केले नाही तर मी कधीच काही करू शकणार नाही. मृणालला वाटायचे की 23 व्या वर्षी आपलं लग्न होईल आणि मुलं होतील, आणि हीच गोष्ट मला नको होती. मला काहीतरी वेगळं करायचं होतं. तेव्हा मी ऑडिशन द्यायचे. असे काही क्षण होते जेव्हा मला वाटले की मी कोणत्याच लायकीची नाही.

शेंगदाणे विकणारा ‘कच्चा बदाम’ गाण्याचा गायक भुबन बड्याकरची संपूर्ण कहाणी

आयुष्यातीस १५ ते २० हे वर्षे खूप कठीण आहे, कारण तेव्हा लोक स्वतःला समजून घेण्यात गुंतलेले असतात. मृणाल म्हणाली की ज्या लोकांना काय करावे हे अजूनही समजत नाही, त्यांना वाईट वाटते आणि आत्महत्येचे विचार येतात.

यावर मृणाल ठाकूर यांना विचारण्यात आले की त्यांनी कधी आत्महत्येचा विचार केला होता. तेव्हा मृणाल म्हणाली, ‘मी लोकल ट्रेनने प्रवास करायचे. दारात उभी राहायची आणि कधी कधी मला बाहेर उडी मारावीशी वाटायची.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)


मृणाल त्यावेळी मुंबईत एकटीच राहत होती. ती म्हणाली, ‘मुंबईसारख्या शहरात मी १७-१८ वर्षांची असताना एकटी राहत होते. तुम्हाला तुमच्या जेवणाची आणि भाड्याची काळजी घ्यावी लागते, प्रत्येक रुपयाचा हिशोब बाबांना द्यावा लागत असायचा.

ये खामोशियां आणि कुमकुम भाग्य या मालिकांमध्ये मृणालने काम केले आहे. यानंतर मृणालने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले. सुपर ३०, बाटला हाऊस, तूफान आणि धमका या चित्रपटांनंतर आता मृणाल जर्सी आणि पिप्पा या चित्रपटात दिसणार आहेत.

चाणक्य नीति: ‘या’ 5 गोष्टी कोणालाही सांगू नका, येऊ शकते मोठी अडचणीत!