सतीश कौशिक यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माधुरीची आई स्नेहलता देशमुख Madhuri Dixit Mother Death यांचे निधन झाले आहे. आज म्हणजेच 12 मार्च 2023 रोजी सकाळी 8.40 वाजता निधन झाले. त्यांचे वय 91 वर्षे होते. त्यांच्या आईवर आज दुपारी 3 ते 4 वाजता मुंबईतील वरळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माधुरी दीक्षित तिच्या आईच्या खूप जवळ होती.
Actress Madhuri Dixits Mother Mrs Snehlata Dixit passed away.
Om Shanti 🙏#MadhuriDixit @MadhuriDixit @DoctorNene pic.twitter.com/m34l6clSRj
— Ashish Mishra (@AshishMisraRBL) March 12, 2023
माधुरी दीक्षित तिची आई स्नेहलता यांच्या खूप जवळ होती. गेल्या वर्षी जूनमध्ये माधुरीने तिच्या आईचा 90 वा वाढदिवस साजरा केला आणि तिच्या आईचा वाढदिवस साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिच्या आईसोबतच्या आठवणी शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा! आई ही मुलीची सर्वात चांगली मैत्रीण असते असे म्हणतात. ते खरंच बरोबर आहे. तू माझ्यासाठी केलेले सर्व काही, तू मला शिकवलेले धडे ही तू मला दिलेली सर्वात मोठी भेट आहे.
To my precious, my support system, the most beautiful woman in the whole world, my anchor in the stormy sea of life and the wind in my sails… I cherish you more with each passing day, today is just a little extra special. Happy Birthday Mom👩👧♥️ pic.twitter.com/jZN8ErzNQL
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) June 27, 2020
माधुरी दीक्षितच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिच्या आईने तिला खूप साथ दिली. चित्रपटाचे शूटिंग असो किंवा कोणताही कार्यक्रम, तिची आई नेहमीच माधुरीसोबत असायची. अभिनेत्रीने अनेकदा सांगितले आहे की, स्टार असूनही सामान्य जीवन जगण्यात तिच्या आईचा मोठा हात आहे.