खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड; अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट

WhatsApp Group

ठाणे – अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही आपल्या सोशल मीडियातील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियातील पोस्टमुळे केतकी यापूर्वी अनेकदा ट्रोलही झाली आहे. त्याच दरम्यान आता पुन्हा एकदा केतकी चितळे चर्चेत आली आहे आणि ती म्हणजे तिने केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे.

केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

केतकीने फेसबूक पोस्टमध्ये काय म्हटलयं?

तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा
ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक
सगळे पडले उरले सुळे, सतरा वेळा लाळ गळे
समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप
ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू ? तू तर मच्छर
भरला तुझा पापघडा, गप! नाही तर होईल राडा
खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड
याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड

अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिले आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टनंतर कळवा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलीस स्टेशनमध्ये 153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे आता केतकी चितळे अडचणीत आली आहे.