
मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणारे मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. केतकी ही सध्या ठाणे कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. केतकीच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता तिला याप्रकरणी आता मोठा दिलासा मिळाला आहे.
केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट केल्यामुळे अटक करण्यात आली होती. केतकी चितळे विरोधात 14 मे रोजी कळवा पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी समर्थकांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर केतकीला अटक करण्यात आली होती. आता केतकीचा जामीन मंजूर झाला असून उद्या 23 जून रोजी उद्या ठाणे कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. केतकीचा 40 दिवस तुरुगांत मुक्काम होता.