Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर, मात्र पुढचे पाच दिवस राहावे लागणार तुरूंगात

WhatsApp Group

मुंबई – अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे. केतकी चितळेला अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईमधील रबाळे पोलीस ठाण्यात २०२०‌ साली अॅट्रोसेटी कायद्याअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणीच तिला (ketki chitale granted bail) जामीन मंजूर झाला आहे.

नवी मुंबई पोलिसांनी केतकी चितळेला अटक केल्यानंतर तिला ठाणे न्यायालयाने न्यालयीन कोठडी सुनावली होती. ठाणे न्यायालयामध्ये याप्रकरणी आज सुनावणी पार पडली. यावेळी युक्तिवाद होऊन तिला 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

केतकी चितळेला ठाणे कोर्टाने दिलासा दिला असला तरीही ती तुरूंगातच राहणार आहे, कारण ती आणखी एका प्रकरणात आरोपी आहे. ज्या प्रकरणावर 21 जून रोजी जामीनावर सुनावणी होणार आहे.