
अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच तिची मतं सोशल मीडियावर व्यक्त करत असते. 2022 मध्ये केतकीच्या वादग्रस्त पोस्टमुळे तिला जेलमध्ये जावं लागलं होतं. संपूर्ण वर्षभर केतकी खूप चर्चेत राहिली. केतकीला काही महिन्याआधीच तिच्या फेसबुकचे अक्सेस परत देण्यात आले. त्यानंतर केतकी सोशल मीडियावर जास्त करून फेसबुकवर सक्रीय झाली. त्यानंतर केतकीच्या सोशल मीडिया पोस्ट पुन्हा चर्चेत येत आहेत. दरम्यान 31 डिसेंबरला केतकीने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. केतकी नेटकऱ्यांच्या पुन्हा निशाण्यावर आली आहे. इतकंच नाही तर नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला केतकीकडून उत्तर देखील देण्यात आलं आहे.
केतकीने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिच्या हातात दारूचा ग्लास दिसत आहे. ग्लास हातात घेऊन केतकी सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देत आहे. हा व्हिडीओ शेअर करत केतकीनं एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात तिनं म्हटलंय, ‘माफ करा पण कधी विसरु नका.. नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा’ असे बोलत आहे. सोबतच तिच्या हातात दारुचा ग्लास आहे. या व्हिडीओला तिने, “मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब 100% गलत है।”
केतकीचा दारू पितानाचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. केतकी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ट्रोल होतं आहे. एका युझरनं म्हटलं, ‘वाह दीदी… लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका आणि आपण ढोसायचं’. या युझरला उत्तर देत केतकीने वादग्रस्त्र वक्तव्य केलं आहे. तिनं म्हटलंय, मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देव ही दारू पितात. काली मातेला तर दारूचे नैवेद्य असते. तसेच काही शंकराच्या मंदिरात ही. स्वतः ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते व सांगते. फरक शिका.
करिश्मा कपूरने वयाच्या 48 व्या वर्षी दाखवली बोल्ड स्टाईल, फोटो होतोय व्हायरल