साजिद खानने काम देण्याच्या बहाण्याने ऑफिसमध्ये बोलवलं आणि मग…मराठी अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ

WhatsApp Group

कॉमेडी चित्रपट बनविणारा बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान सध्या बिग बॉस 16चा स्पर्धक आहे. साजिद बिग बॉसमध्ये गेल्यापासूनच त्याच्या या शोमध्ये असण्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने #MeToo अंतर्गत साजिद खानावर गुन्हा देखील दाखल केला आहे. तसेच त्याला तात्काळ शोमधून बाहेर काढण्याची मागणी देखील तिने केली होती. दरम्यान आता मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाडने साजिदवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

जयश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणते, ‘आठ वर्षांपूर्वी एका कास्टिंग डायरेक्टरने मला एका पार्टीला नेले होते. तिथे माझी भेट साजिद खानशी झाली. साजिदला भेटून आनंद झाला. दुसऱ्या दिवशी साजिदने मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं. तो म्हणाला की तो एक चित्रपट बनवत आहे आणि त्यात माझी भूमिका असेल. ऑफिसमध्ये गेल्यापासून तो मला इकडे-तिकडे स्पर्श करून अश्लील कमेंट करू लागला.

साजिद खानवर त्याची एक्स असिस्टंट सलोनी चोप्राने देखील गंभीर आरोप केले होते. याशिवाय पत्रकार करिश्मा उपाध्याय यांच्याकडूनही त्याच्यावर अश्लील आणि असभ्य वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा