बिनलग्नाची आई बनली Ileana DCruz; दिला मुलाला जन्म, शेअर केला बाळाचा पहिला फोटो

0
WhatsApp Group

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. इलियाना आता आई झाली आहे, तिच्या गरोदरपणाची घोषणा झाल्यापासून चाहते या गुड न्यूजची वाट पाहत होते. इलियानाने तिच्या नवजात बाळाचा फोटोही शेअर केला असून ती एका मुलाची आई झाल्याचे सांगितले आहे. अभिनेत्रीने या पोस्टमध्ये तिच्या मुलाचे नावही नमूद केले आहे. हा फोटो इतका गोंडस आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा पहाल.

इलियानाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये मुलाचे नावही उघड करण्यात आले आहे. इलियानाने पोस्टमध्ये मुलाचा फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट करत तिने लिहिलं, ‘आमच्या लाडक्या मुलाचे जगात स्वागत करताना आम्हाला किती आनंद होत आहे हे कोणत्याही शब्दात सांगू शकत नाही. मन आनंदाने भरून आलंय. असं लिहीत तिने बाळाचा फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबतच त्याचं नावही लिहिलं आहे. तिच्या बाळाचं नाव आहे कोआ फिनिक्स डोलन. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)

इलियन डिक्रूझने 18 एप्रिल 2023 रोजी तिच्या गर्भधारणेबद्दल सांगितले होते. तिने एका पोस्टद्वारे सर्वांनाच धक्का दिला. त्या मुलाचे वडील कोण, याचा खुलासा झाला नाही. आता इलियानाने ही आनंदाची बातमी दिली आहे. चाहत्यांकडूनच नाही तर बॉलिवूड कलाकारांकडूनही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)