Harshali Malhotra: ‘बजरंगी भाईजान’ची ‘मुन्नी’ अभ्यासातही अव्वल! 10वी मध्ये मिळाले इतके मार्क्स

0
WhatsApp Group

सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारून प्रसिध्द झालेली हर्षाली मल्होत्रा (Harshali Malhotra) अनेकदा चर्चेत असते. आजकाल कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकेत दिसली नसली तरी हर्षाली मल्होत्रा चर्चेत असते. हर्षाली सोशल मिडियावर खूप सक्रिय असते. पण तिने तिच्या दहावीच्या निकालाने तिने सिध्द केले आहे की ती केवळ अभिनय आणि नृत्यच करण्यातच नाही तर अभ्यासातही हुशार आहे.

हर्षाली मल्होत्राने यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती, तिचा निकाल जाहीर झाला आहे. हर्षालीने आता सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना गुण सांगितले आहे. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत तिने आपण चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाल्याची खुशखबर दिली आहे.

हर्षालीला किती टक्के मिळाले?

हर्षालीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने ट्रोलर्सच्या कमेंट्स शेअर केल्या आहेत ज्यामध्ये ते अभ्यास करत नसल्यामुळे तिला ट्रोल करत आहेत. सर्वांचे आभार, मला दहावीमध्ये ८३ गुण मिळाले आहेत असं लिहित ट्रोलर्संना उत्तर दिलं आहे.