
अभिनेत्री बिपाशा बसू सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे सतत चर्चेत असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते, ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. आता बिपाशाने मॅटर्निटी फोटोशूट केले आहे, ज्याचा फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मात्र, यावेळी तिच्या फोटोशूटमुळे ती खूप ट्रोल होत आहे. काही युजर्सना तिचे मॅटर्निटी फोटोशूट बोल्ड स्टाईलमध्ये करणे पसंत पडले नाही आणि बिपाशाचा फोटो व्हायरल होताच लोक एकामागून एक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
मॅटर्निटी फोटोशूटमध्ये, बिपाशा बसूने गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये स्वतःला झाकले आहे आणि स्टूलवर बसून बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले – “स्वतःवर प्रेम करा, ज्या शरीरात तुम्ही राहता त्या शरीरावर प्रेम करा”. तिचा हा फोटो व्हायरल होताच ट्रोलर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
View this post on Instagram
बिपाशा बसूच्या मॅटर्निटी फोटोशूटच्या फोटोला उत्तर देताना एका यूजरने लिहिले – “किमान गरोदरपणात तरी असे फोटो काढणे आवश्यक नाही”. तर दुसर्याने लिहिले – अश्लीलतेची परिसीमा गाठली आहे. त्याचप्रमाणे इतरही आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.