अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा मृत्यू, चेहऱ्यावर गंभीर जखमा

WhatsApp Group

Bhagyashree Mote Sister Madhu Markandeya Found Dead: मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण तिची बहीण मधु मार्कंडेय हिचे आकस्मिक निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या बहिणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला असून तिच्या चेहऱ्यावरही जखमांच्या खुणा आहेत. यामुळे भाग्यश्रीला मोठा धक्का बसला आहे. भाग्यश्री मोटेच्या बहिणीचे काय झाले, तिच्या मृत्यूबद्दल काय बोलले जात आहे, काय होती भाग्यश्रीची प्रतिक्रिया आणि याप्रकरणी पोलीस काय करत आहेत. जाणून घेऊया.

अभिनेत्री भाग्यश्री मोटेची बहीण मधु मार्कंडेय यांचे आकस्मिक निधन झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, मधु तिच्या मैत्रिणीसोबत केकचा व्यवसाय करत होती आणि या रविवारी म्हणजेच 12 मार्च रोजी ती तिच्या मैत्रिणीसोबत भाड्याची खोली पाहण्यासाठी गेली होती, तेव्हा तिला अचानक चक्कर आली. नंतर तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे उपचार न झाल्याने तिला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आले असता तिला मृत घोषित करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

भाग्यश्री मोटे यांची बहीण मधु मार्कंडे हिच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे मधुचा खून झाला आहे, असं तिच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. तिच्या मृत्यूप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. भाग्यश्रीने स्वतः एक पोस्ट शेअर केली आहे आणि तिच्या बहिणीच्या मृत्यूची बातमी सांगणारा संदेशही लिहिला आहे.