
पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक म्हणजे या सेक्स रॅकेटची मास्टरमाईंड ही 41 वर्षीय अभिनेत्री आहे. पोलिसांनी धाड टाकून केलेल्या कारवाईत या 41 वर्षीय अभिनेत्रीला अटक केली आहे. या अभिनेत्रीचं नाव अनुष्का मोनी मोहन दास असे आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काशिमीरा परिसरात सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीवरून महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक म्हणून दोन लोकांना पाठवले, ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक म्हणून पाठवलेल्या दोघांनी आरोपी अनुष्का मोनी मोहन दास हिच्यासोबत संपर्क साधला. आरोपी अनुष्काने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशिमीरा येथील एका मॉलमध्ये या ग्राहकांना भेटण्यासाठी बोलावले होते. वसई-विरार पोलिसांच्या मीरा-भाईंदरचे सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांनी पीटीआयला सांगितले की, “पोलिसांच्या टीमने परिसरात छापा टाकला आणि बनावट ग्राहक म्हणून पाठवलेल्या लोकांकडून पैसे स्वीकारताना आरोपीला रंगेहाथ पकडले. आम्ही टीव्ही सीरियल आणि बंगाली चित्रपटात सक्रिय असलेल्या दोन अभिनेत्रींचीही सुटका केली.
पोलिसांनी 41 वर्षीय अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास हिला सेक्स रॅकेट चालवल्या प्रकरणात अटक केली आहे. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले होते, त्यानंतर तिला रंगेहाथ पकडण्यात आले. यासोबतच, टीव्ही सीरियल आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलेल्या दोन अभिनेत्रींची पोलिसांनी सुटका केली आहे. बनावट ग्राहक अनुष्काला भेटयला गेले तेव्हा पोलीस टीम आधीच अलर्ट होते. अनुष्का दासने त्या बनावट ग्राहकांकडून पैसे घेताच, पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला आणि तिला रंगेहाथ पकडले.