
‘अवघाचि हा संसार’ या टीव्ही मालिकेमधून प्रेक्षकांच्या घरा घरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता सुभाष 43व्या वर्षी आई होणार आहे. अमृता सुभाषने इन्स्टाग्रामवरून एक फोटो पोस्ट करून ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. बातमी कळताच अमृता सुभाषच्या चाहत्यांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
View this post on Instagram
अमृता सुभाषने इन्स्टाग्रामवर प्रेग्नंसी टेस्टचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये एक प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलेली स्ट्रीप आणि एक बाळाचं खेळणं दिसत आहे. ‘ओह… द वंडर बीगिन्स…’, असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे.