
बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर आई-बाबा झाले असून त्यांच्या घरी इवल्याश्या परीने जन्म घेतलाय. रिपोर्ट्सनुसार आलियाने एका मुलीला जन्म दिला आहे. रणबीर आणि आलिया आई-वडील झाल्यावर संपूर्ण कपूर आणि भट्ट कुटुंब आनंदी आहे.
आलिया आणि रणबीरसाठी हे वर्ष खूप खास होते. या वर्षी एप्रिलमध्ये दोघांनी लग्न केले. जूनमध्ये आलियाने पुन्हा तिच्या गर्भधारणेची घोषणा केली आणि त्यानंतर आता दोघेही आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याचे चाहते सोशल मीडियावर खूप खुश असून लक्ष्मी घरी आल्याचे सांगत आहेत. मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
View this post on Instagram
आलियाने लग्नाच्या 2 महिन्यांनंतर म्हणजेच 27 जून 2022 रोजी तिच्या गर्भधारणेची घोषणा केली होती. तेव्हापासून चाहते छोट्या पाहुण्याच्या येण्याची वाट पाहत होते.2017 मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. 5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या वर्षी त्यांनी लग्न केले.