अभिनेता सोनू सूदची कार जप्त, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

WhatsApp Group

मोगा – पंजाबमध्ये मतदानादरम्यान मोगा पोलिसांकडून अभिनेता सोनू सूदची Actor Sonu Sood कार जप्त करण्यात आली आहे. सोनू सूद दुसऱ्या मतदान केंद्रावर गेल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. अकाली दलाने सोनू सूद विरोधात निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने सूचना दिल्या, त्यानंतर मोगा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सोनू सूद हा आपल्या मतदान केंद्रानंतर इतर मतदान केंद्रांवरही जात असल्याची तक्रार अकाली दलाकडून करण्यात आली होती.

सोनू सूद हा इतर मतदान केंद्रांवर जात होता. यामुळे त्याची कार जप्त करण्यात आली आहे. त्याला घराबाहेर पडण्यास आता मज्जाव करण्यात आला आहे. तरीही जर सोनू सूद घराबाहेर पडल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती मोगा जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी प्रदीप सिंह यांच्याकडून देण्यात आली आहे.

अकाली दलाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून सोनूवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सोनू सूदची कार जप्त केली आहे. त्यामुळे सोनू सूदला दुसऱ्या वाहनातून जावे लागले आहे. महत्वाचे म्हणजे सोनू सूदची बहीण मालविका सूद या मोगा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहे. काँग्रेसने मालविका यांना मोगामधून उमेदवारी दिली आहे.