बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि पटकथा लेखक शिवकुमार सुब्रमण्यम यांचे निधन झाले आहे. शिवकुमार यांची बॉलिवूडमध्ये खास ओळख होती. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच दुःख झाले आहे.
शिवकुमार सुब्रमण्यम यांनी ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील त्यांचा अभिनय आणि व्यक्तिरेखा खूप आवडल्या होत्या. त्यांच्या निधनाचे कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण अचानक अशा प्रकारे या जगाचा निरोप घेतल्याने सर्वांचे डोळे ओलावले आहेत.
Gutted to hear this news. Incredibly tragic, esp as it happened just two months after the passing of his and Divya’s only child – Jahaan, taken by a brain tumour 2 weeks before his 16th birthday.
RIP #ShivkumarSubramaniam https://t.co/GkW6ATUhhN— beena sarwar (@beenasarwar) April 10, 2022
दोन महिन्यांपूर्वी झाला होता मुलाचा मृत्यू
सर्वात दु:खद बाब म्हणजे अभिनेता शिवकुमार सुब्रमण्यम यांनी 2 महिन्यांपूर्वी आपला मुलगा गमावला. त्यांच्या मुलाला ब्रेन ट्यूमर झाला होता, ज्यामुळे अभिनेत्याच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या निधनानंतर अवघ्या 2 महिन्यांतच आता शिवकुमार यांनीही या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.
आलिया भट्टच्या चित्रपटात केले आहे काम
अभिनेता शिव कुमार हे आलिया भट्टच्या 2 स्टेट्स या चित्रपटातही त्यांनी काम केलं आहे. याशिवाय तीन पट्टी, राखी मुखर्जीचा हिचकी या चित्रपटातही त्यांनी काम केलं आहे. त्याने मुक्ती बंधन या मालिकेतही काम केले आहे. अभिनेता असण्याव्यतिरिक्त, ते परिंदा, 1942 ए लव्ह स्टोरी आणि हजारों ख्वैशीं ऐसी सारख्या चित्रपटांसाठी पटकथा लेखक देखील होते. शिवकुमार यांच्या पार्थिवावर मोक्षधाम हिंदू स्मशानभूमी, सीझर रोड, आंबोली, अंधेरी पश्चिम, मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.