अभिनेता मनोज बाजपेयीवर कोसळला दुःखाचा डोंगर; आईचं छत्र हरपलं

WhatsApp Group

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला आहे. मनोज बाजपेयी यांच्या आई गीता देवी यांचे निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. गीता देवी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र गीता देवी यांचे आज सकाळी म्हणजेच गुरुवारी निधन झाले.

आईच्या निधनानंतर मनोजसह तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या घरी दुःखाचे वातावरण आहे. अशोक पंडित यांनी आपल्या ट्विटद्वारे ही माहिती सर्वांना दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गीता देवी यांच्या प्रकृतीत काही दिवसांपूर्वी सुधारणा दिसून आली होती. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली बरे वाटत होते. मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती ढासळू लागली आणि त्यांचे निधन झाले. मनोजची आई हॉस्पिटलमध्ये दाखल असताना अभिनेता आईला भेटायला यायचा. शुटिंगमधून वेळ काढून मनोज आईच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात येत असे.