अभिनेता महेश कोठारे यांच्या आईचे निधन… ट्विट करत दिली माहिती

0
WhatsApp Group

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे यांच्या आई सरोज कोठारे यांचे निधन झाले आहे. सरोज कोठारे यांनी वयाच्या 93 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. महेश कोठारे यांचा मुलगा आणि अभिनेते आदिनाथ कोठारे यांने आजीच्या निधनाची माहिती देणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अभिनेते महेश कोठारे यांनीही ट्विट करून सरोज कोठारे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

‘स्व. सौ. सरोज अंबर कोठारे यांना संपूर्ण कोठारे कुटुंबाकडून भावपूर्ण श्रद्धांजली. तुमच्या आत्म्याला शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना,’अशी पोस्ट आदिनाथ कोठारेने केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare)