तारक मेहता फेम अभिनेता गुरचरण सिंग 4 दिवसांपासून बेपत्ता

0
WhatsApp Group

TMKOC Actor Gurucharan Singh Missing: प्रसिद्ध अभिनेते गुरचरण सिंह यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोढीची व्यक्तिरेखा साकारून घराघरात प्रसिद्ध झालेला अभिनेता गुरचरण सिंग सध्या गायब आहे. गुरुचरण सिंग यांच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता वयाच्या 50 व्या वर्षी गुरुचरण सिंग बेपत्ता झाले आहेत. ही बातमी ऐकून चाहतेही चिंतेत आहेत.

गुरुचरण सिंग यांच्या वडिलांनी पोलिसांना लेखी तक्रार दिली आहे की, त्यांचा मुलगा 22 एप्रिल रोजी दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरातून मुंबईला निघाला होता आणि तेव्हापासून तो बेपत्ता आहे. गुरुचरण सिंगच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, तो मुंबईला पोहोचला नाही किंवा घरी परतला नाही आणि त्याचा फोनही लागत नाही. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आम्ही तक्रार नोंदवली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.