बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आता (Bollywood Actor Govinda) पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री करणार आहे. गोविंद राजकारणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोविंदा या वर्षी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवू शकतो, अशी बातमी आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभेच्या जागेसाठी गोविंदाचे नाव चर्चेत आहे. सूत्रांच्या हवाल्याने गोविंदा एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. गोविंदा शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवू शकतात.
उत्तर पश्चिम मतदार संघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे. गजानन किर्तीकर यांचं वय लक्षात घेता, त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा, या अनुशंगानं अभिनेता गोविंदाच्या नावाची चर्चा आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…