Arun Bali Passes Away: ‘केदारनाथ’ फेम अरुण बाली यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

WhatsApp Group

Arun Bali Died: मनोरंजन विश्वासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारे अभिनेते अरुण बाली यांचे निधन झाले आहे. अरुण बाली यांनी वयाच्या 79 व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण बाली यांनी पहाटे साडेचार वाजता अखेरचा श्वास घेतला. अनेक दिग्गज कलाकारांसोबतही त्यांनी काम केले होते.

अरुण बाली अनेक दिवसांपासून आजारी होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.अरुण बाली हे Myasthenia Gravis या दुर्मिळ आजाराशी झुंज देत होते. अरुण बाली यांच्या निधनाने टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

अरुण बालीने 90 च्या दशकात आपल्या करिअरला सुरुवात केली होती. राजू बन गया जेंटलमन, खलनायक, जब वी मेट, फूल और अंगारे, केदारनाथ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडली आहे. याशिवाय त्याने ‘बाबुल की दुआं लेती जा’, कुमकुम सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा