
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे(Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयामध्ये(Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं.
मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.
अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. विनायक मेटे यांचा मुलगा देखील यावेळी त्यांच्यासोबत गाडीत असल्यामुळे त्यालाही किरकोळ जखम झाल्याची माहिती आहे. विनायक मेटे यांच्या झालेल्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे.
विनायक मेटे यांची कारकीर्द
- अखिल भारतीय मराठा महासंघातून ‘कामाला सुरुवात
- 5 वेळा विधपरिषदेचे आमदार
- 1994 मध्ये मराठा महासंघाचे सचिव म्हणून नियुक्ती
- 2002 शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली
- 2012 मध्ये ते राष्ट्रवादीचे प्रदेशअध्यक्ष होते.
- 2014 मध्ये ते राष्ट्रवादीमधून बाहेर पडले
- 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
- 2016 मध्ये त्यांना भाजपकडून त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली.
- 2016 मध्ये शिवस्मारक समितीच्या अध्यक्ष पदी निवड झाली
- 2017 मध्ये शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद पक्ष त्यांनी स्थापन केला.
- 2019 मध्ये सर्व निवडणुका भाजपसोबत लढवण्याची घोषणा