प्रवीण दरेकरांच्या गाडीला अपघात, घातपाताचा संशय

WhatsApp Group

मुंबई – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर Pravin Darekar यांच्या ताफ्यातील गाडीचा शनिवारी सकाळी मुंबईमध्ये अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर ही घटना घडली. गेल्या महिनाभरामध्ये प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा अपघात होण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे आता घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता प्रवीण दरेकर हे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहेत.

या अपघातानंतर प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते बोलताना म्हणाले, मी राज्यभरात पक्षाच्या कामासाठी फिरत असतो. माझ्या गाडीला या महिनाभरात झालेला हा तिसरा अपघात आहे. याआधी काही दिवसांपूर्वी मालेगाव त्यानंतर खंडाळ्यात माझ्या गाडीचा अपघात झाला होता.

दरवेळी माझ्या गाडीसमोर बाईकस्वार आल्यामुळे अपघात झाला आहे. आजदेखील मुंबईमध्ये असताना गाडीसमोर अचानक बाईकस्वार आला आणि गाडीचा अपघात झाला. त्यामुळे मला यामध्ये घातपाताचा संशय येत आहे. त्यामुळे मी आता या सगळ्याच्या चौकशीची मागणी करणार आहे. त्यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहणार आहे असं प्रवीण दरेकर यांनी सांगितले.