आमदार बच्चू कडू यांचा अपघात; डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत

WhatsApp Group

राज्य सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना दुचाकीने धडक दिल्याची बातमी समोर आली आहे. सकाळी 6 ते साडे सहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने धडक दिली आहे. या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला, डोळ्याला आणि पायाला जखमा झाल्या आहेत. अपघातानंतर बच्चू कडू यांना अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा रस्ता अपघातात झाला होता. या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली. बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला. धनंजय मुंडे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते राहिले आहेत. त्यांनी स्वत: फेसबुकवर अपघाताची माहिती दिली होती.