पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ एका भरधाव टँकरने एकदोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात सर्व 48 वाहनांचे नुकसान झाले असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी उशिरा हा कंटेनर पुलाजवळील उतारावरून उतरताना नियंत्रण सुटून समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना धडकला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि रस्त्यावरून जाणारे बचावकार्यात सहभागी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमींवर दोन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिक पोलीस आणि पुणे शहर आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 8.30 च्या सुमारास नवले पूल परिसरात ही घटना घडली. पीएमआरडीए अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांनी सांगितले की, काही जखमींना जवळपास राहणाऱ्या नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
A major accident occurred at Navale bridge on the Pune-Bengaluru highway in Pune in which about 48 vehicles got damaged. Rescue teams from the Pune Fire Brigade and Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) have reached the spot: Pune Fire Brigade pic.twitter.com/h5Y5XtxVhW
— ANI (@ANI) November 20, 2022
नवले पुलावर हा अपघात झाल्याची माहिती सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. पुणे अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अपघाताची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
#WATCH | Six people were injured in a major accident at Navale bridge on the Pune-Bengaluru highway in Pune where a truck lost control and rammed into several vehicles stuck in traffic on the bridge, No casualties reported so far: DCP (Traffic) Pune City Police Vijay Kumar Magar pic.twitter.com/914eo0dbuh
— ANI (@ANI) November 20, 2022