Rajan Salvi: ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबाला ABCची नोटीस

WhatsApp Group

मुंबई: राज्यातील उद्धव ठाकरे सरकार सत्तेतून बाहेर पडल्यानंतरही अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आता उध्दव ठाकरे गटापुढे नवी अडचण निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. आमदारासोबतच त्यांच्या पत्नी आणि भावाला 20 मार्च रोजी चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे.

एनआयए या वृत्तसंस्थेनुसार, एसीबीने उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी, त्यांची पत्नी आणि कुटुंबातील 3 सदस्यांना 20 मार्चला चौकशीसाठी एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही साळवी यांची एसीबीने अलिबाग येथील ब्युरो ऑफिसमध्ये साडेचार तास चौकशी केली होती. एसीबी बेकायदेशीर संपत्तीचा तपास करत आहे. त्यावर साळवी म्हणाले की, एसीबी आपल्यावर चुकीची कारवाई करत आहे. भाजपच्या इशाऱ्यावर हे सर्व कट रचले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र यामुळे आपण निराश होणार नाही. पुढील चौकशीला सामोरे जाणार असे ते म्हणाले.