एअर इंडियाच्या विमानात घृणास्पद कृत्य; दिल्ली विमानतळावर केलं अटक

WhatsApp Group

फ्लाइटमध्ये लघवी केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये घडली, त्यानंतर आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. फ्लाइट कॅप्टनच्या वतीने IGI विमानतळावरील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपीला तेथून अटक केली. राम सिंह असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 24 जून रोजी एअर इंडियाच्या एआयसी 866 फ्लाइटमध्ये ही घटना घडली. पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, राम सिंह नावाच्या प्रवाशाने विमानाच्या जमिनीवर शौच केले आणि लघवी केली आणि नंतर थुंकले. यावेळी चालक दलातील सदस्यांनी प्रवाशाला तोंडी इशारा दिला, मात्र तरीही तो थांबला नाही, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, चेतावणी दिल्यानंतर केबिन क्रूने फ्लाइटच्या कॅप्टनला माहिती दिली. यानंतर कॅप्टनने कंपनीला मेसेज पाठवला, ज्यामध्ये एअरपोर्ट सिक्युरिटीला आरोपी व्यक्तीला विमानतळावर पकडण्यास सांगण्यात आले. विमान कंपनीने सांगितले की, एकत्र प्रवास करणाऱ्या लोकांनी याचा निषेध केला आणि ते यामुळे प्रचंड संतापले, त्यानंतर केबिन क्रूने सर्व प्रवाशांना शांत केले. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, असे सर्वांना सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्ती आफ्रिकेत स्वयंपाकी म्हणून काम करतो. जो एअर इंडियाच्या एआयसी 866या विमानातून मुंबईला जात होता. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘दिल्ली पोलिसांनी फ्लाइट कॅप्टनच्या तक्रारीवरून कलम 294/510 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली, त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला जामीन मंजूर करण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.