धक्कादायक निर्णय, एबी डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

WhatsApp Group

क्रिकेटविश्वातील दिग्गज फलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने एक ट्वीट करत आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे आहे. डिव्हिलियर्सने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘ माझ्यासाठी हा एक माझ्यासाठी अविश्वसनीय प्रवास होता, परंतु मी आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.’


डिव्हिलियर्सने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आरसीबीकडून एक व्हिडिओ ट्वीट करण्यात आला आहे ज्यात एबी म्हणतो, ‘मी आयुष्यभर आरसीबीचा भाग राहणार आहे. आरसीबीच्या संघातील प्रत्येकजण माझ्यासाठी एक कुटुंब बनला आहे. लोक येतात आणि जातात, पण आरसीबीची एकमेकांबद्दलची भावना आणि प्रेम नेहमीच कायम राहील. मी आता अर्धा भारतीय आहे आणि मला याचा अभिमान आहे.

37 वर्षीय एबी डिव्हिलियर्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. आतापर्यंत एबीने 184 आयपीएल सामन्यांमध्ये 39.70 च्या सरासरीने 5162 धावा केल्या ज्यात त्याने तीन शतके आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे. एबी डिव्हिलियर्सने IPL-14 च्या मोसमात दमदार खेळी साकारली होती. यादरम्यान डिव्हिलियर्सने सात सामन्यांत 51.75 च्या उत्कृष्ट सरासरीने एकूण 207 धावा केल्या आहेत.

एबी डिव्हिलियर्सच्या या निर्णयामुळे आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) च्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण एबी डिव्हिलियर्स आता आयपीएलमध्येही सहभागी होणार नाही. अनेक वर्षांनंतर RCB एबी डिव्हिलियर्सशीवाय खेळणार आहे.