IPL 2022 : श्रेयस अय्यरला मिळणार वर्ल्ड चॅम्पियनची साथ, कोलकाता संघात ‘या’ खेळाडूची एन्ट्री!

WhatsApp Group

दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघात आयपीएल स्पर्धेपूर्वी मोठा बदल झाला आहे. केकेआरचा ओपनिंग बॅटर अ‍ॅलेक्स हेल्सने (Alex Hales) बायो-बबलचे कारण देत स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे हेल्सच्या जागी टी-20 वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन अ‍ॅरॉन फिंचचा (Aaron Finch) केकेआर समावेश केला आहे.

केकेआरने हेल्सला 1.50 कोटींमध्ये करारबद्ध केलं होतं. बायो-बबलच्या थकव्याचे कारण देत आयपीएल स्पर्धेतून माघार घेतलेला तो इंग्लंडचा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी गुजरात टायटन्सच्या जेसन रॉयने (Jason Roy) आगामी सिझनमधून या कारणामुळे माघार घेतली आहे.

फिंचने आजवरच्या आयपीएल कारकिर्दीत 87 मॅचमध्ये 2005 रन केले आहेत. यामध्ये 14 अर्धशतकांचा समावेश आहे. केकेआरची पहिली मॅच 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध होणार आहे. त्याच काळात ऑस्ट्रेलियाची टीम पाकिस्तान विरूद्ध लिमिटेड ओव्हर्सची सीरिज खेळणार आहे. त्यामुळे फिंच सुरूवातीच्या काही मॅचमध्ये उपलब्ध नसेल.

कोलकाता नाईट रायडर्सची संपूर्ण टीम

व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कॅप्टन), शेल्डन जॅकसन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनिल नारायण, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, सॅम बिलिंग्स, अनुकूल रॉय, रसीक सलाम, अभिजीत तोमर, प्रथम सिंग, अमन खान, रमेश कुमार, अशोक शर्मा, टीम साऊदी, अ‍ॅरॉन फिंच, मोहम्मद नबी, उमेश यादव, बी इंद्रजीत, चामिका करुणारत्ने