Aaditya Thackeray Visit Ayodhya : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर; शेकडो शिवसैनिक अयोध्येत दाखल

WhatsApp Group

मुंबई – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेकडून (Shivsena) जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आदित्य ठाकरे हे लखनऊ विमानतळावर दाखल होणार आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी राज्यातूनही हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत.

असा असणार आदित्य ठाकरे यांचा संपूर्ण दौरा

  • सकाळी 11 वाजता लखनऊ विमानतळावर आगमन
  • दुपारी 1.30 वाजता- अयोध्येत आगमन त्यानंतर इस्कॉन मंदिराला भेट
  • दुपारी 2.30 ते 3.30 वाजण्याच्या दरम्यान पत्रकार परिषद
  • दुपारी 4.30 वाजता- हनुमान गढी येथे दर्शन घेणार
  • संध्याकाळी 5 वाजता- प्रभू श्री रामाचं दर्शन घेणार
  • संध्याकाळी 6 वाजता- लक्ष्मण किल्ला येथे भेट देणार
  • संध्याकाळी 6.45 वाजता- शरयू नदीच्या घाटावर आरती करणार
  • संध्याकाळी 7.30 वाजता- लखनऊला प्रस्थान