नवी दिल्ली – कोरोना लसीकरणासाठी Covid-19 vaccination आता आधार कार्ड Aadhaar card आवश्यक नाही. याबाबत सुप्रीम कोर्टाला माहिती देताना केंद्र सरकारने सांगितले की, कोविड लसीकरण करण्यासाठी आधार कार्डची गरज नाही. सरकारने आधार कार्ड नसलेल्या सुमारे 87 लाख लोकांना लसीकरण केले आहे.
कोविन पोर्टलवर लसीकरणासाठी, आधार व्यतिरिक्त, कोविडची नोंदणी इतर नऊ प्रकारच्या ओळखपत्रांसह केली जाऊ शकते. सोमवारी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे, कोविड लसीकरणासाठी आधार कार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता देण्यास आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात निकाली काढण्यात आली आहे.
कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूर्ण आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाला सांगितले की, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदार कार्ड, रेशन कार्ड यासह नऊ ओळख दस्तऐवजांपैकी एक वापरून लसीकरणासाठी नोंदणी केली जाऊ शकते.
हेही वाचा
धक्कादायक! जेवण उशिरा बनवल्याने पत्नीला डिझेल ओतून जिवंत जाळलं
८ महिन्यांच्या बाळासोबत मोलकरीणीने केलेलं हे कृत्य ऐकून अंगावर उभा राहिल काटा!
आमच्या फेसबुक पेजला लाईक करा – https://www.facebook.com/insidemarathi