मुलींची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचे प्रकार वाढतच आहेत. आता राजधानी मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. वरळी ‘सी फेस’ येथे एका गोणीमध्ये या तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाचे हात-पाय तुटलेले आढळले. मुलाची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेपासून मुंबईतील मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.