पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोडजवळील लोकलमध्ये एका तरुणाने 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाड येथे राहणारी तरुणी शुक्रवारी रात्री काही कामासाठी चर्नी रोडला जात असताना ग्रँट रोड स्थानकाजवळ एका तरुणाने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
तो तरुणीवर अश्लील शेरेबाजी करून तिला त्रास देत होता. तरुणीने घाबरून आरडाओरडा केली त्यानंतर तरुणाने उडी मारून पळ काढला. या संदर्भात मुलीने बुधवारी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याआधारे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.