मुंबईतील मालाड पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडणाऱ्या धबधब्यात 25 वर्षीय तरुण वाहून गेला. मद्यधुंद तरुण धबधब्याच्या मध्यभागी उभा होता. त्याच्या मित्राने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नशेत तरुणाचा हात निसटला आणि तो पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला.
स्थानिक लोकांनी तातडीने पोलिसांना (मुंबई पोलीस) घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून शोध सुरू केला. मात्र अद्याप तरुणाचा शोध लागलेला नाही.