ट्रेनच्या दोन डब्यांच्या जॉइंटवर मुलाला घेऊन महिलेचा प्रवास; पहा थरारक व्हिडिओ

WhatsApp Group

रेल्वे अपघाताच्या बातम्या येऊनही लोक सतर्क होत नाहीत. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात ट्रेनमधून पडून अपघात झाले आहेत. याबाबत भारतीय रेल्वेकडून अनेक जनजागृती मोहिमाही राबवल्या जातात. याशिवाय सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे स्थानकांवर सातत्याने मार्गदर्शक सूचनाही दिल्या जातात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो तुम्हाला घाबरवेल. रेल्वेच्या दोन बोगींमध्ये बसून कोणी प्रवास करू शकेल अशी कल्पना तुम्ही करू शकता का? या व्हिडिओमध्ये एक महिला ट्रेनच्या दोन बोगींमध्ये बसून प्रवास करत असल्याचे दिसत आहे.

भारतीय रेल्वेकडून सातत्याने जनजागृती मोहीम राबवूनही प्रवाशांचे निष्काळजीपणा दिसून येत असून, त्यामुळे ते अपघाताचे बळी ठरत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला एका लहान मुलाला मांडीवर घेऊन ट्रेनच्या बोगीमधून प्रवास करताना दिसत आहे. ट्रेनच्या दोन बोगी जिथे जोडल्या गेल्या आहेत तिथे एक महिला नवजात बाळाला घेऊन लोखंडाच्या पातळ पट्टीवर बसलेली आहे. या महिलेने एका हातात मुलाला धरले आहे आणि दुसऱ्या हाताने ट्रेन पकडली आहे. ट्रेन सुसाट वेगाने जात असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. थोडासाही निष्काळजीपणा झाला तर ही महिला ट्रेनमधून खाली पडेल.

रेल्वे अपघातातून धडा घेण्याऐवजी लोक सतत त्याच चुकीची पुनरावृत्ती करताना दिसतात. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात एक माणूस ट्रेनच्या फाटकावर लटकत प्रवास करत होता आणि त्याच्या पाठीवर बॅग होती. त्यानंतर काही अंतर गेल्यावर त्याची बॅग विजेच्या खांबाला धडकली आणि तो खाली पडला.