भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली

0
WhatsApp Group

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये रविवारी पहाटे दोन मजली इमारत कोसळली. ज्यात ६ जण अडकले. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार जणांना सुखरूप बाहेर काढले. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

अग्निशमन विभागाचे अधिकारी राजेश पवार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “इमारतीत सहा जण अडकले होते. आम्ही चार जणांना वाचवले. दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.”