बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी अचानक उभ्या असलेल्या ट्रेनला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून येणाऱ्या फ्रीडम फायटर एक्स्प्रेसमध्ये आग लागली आहे. काही वेळातच आगीची तीव्रता वाढली आणि ट्रेन पेटू लागली. सुदैवाने ट्रेनला आग लागली तेव्हा ती पूर्णपणे रिकामी होती. स्थानकावर उपस्थित नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभ्या असलेल्या फ्रीडम फायटर एक्स्प्रेसच्या बोगीला शनिवारी सकाळी ९ वाजता आग लागली. आतापर्यंत दोन डबे जळाल्याचे सांगण्यात येत आहे. तर तिसरी बोगीही आगीच्या भक्ष्यस्थानी आहे. अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.
#WATCH | Fire breaks out in an empty train at Madhubani railway station in Bihar pic.twitter.com/Rps2N8gwKk
— ANI (@ANI) February 19, 2022
जयनगर येथून रेल्वेचा रेक येथे आणण्यात आला. सदरचे एसडीओ अश्विनी कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव कुमार, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित कुमार यांच्यासह पथक रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्टेशनवर मोठी गर्दी जमली आहे.