
बिहारच्या (Bihar) पूर्णियामध्ये सोमवारी सकाळी भीषण रस्ते अपघात झाला आहे. ट्रक उलटल्यामुळे आठ मजुरांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आहे. या घटनेमध्ये अनेक जखमी झाल्याची माहिती देखील समोर येते आहे.
अपघातग्रस्त ट्रक बोरबेलचा अवड़ सामान घेऊ जात होता. मात्र अचानक ट्रक पलटी झाल्यामुळे सर्व कामगार लोखंडी पाण्याच्या पाईपखाली गाडले गेले ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताचे फोटो अतिशय वेदनादायी आहेत. राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला.