तारकर्लीत पर्यटकांची बोट बुडाली, दोघांचा मृत्यू तर दोन जणांची प्रकृती गंभीर

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – मालवणमधील तारकर्ली येथून मोठी बातमी समोर येत आहे. तारकर्लीमध्ये पर्यटकांची बोट बुडून (Tourist Boat Sank in Tarkarli) दोघांचा मृत्यू झाल्याची घटना (Two persons killed) घडली आहे. तर दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दुर्घटनाग्रस्त बोटीमधून (Boat Accident) एकूण 20 पर्यटक प्रवास करत होते. स्कुबा डायव्हिंग (Scuba Diving) करून परतत असताना हा अपघात झाला. बोट बुडाल्याचे (Boat Accident in Tarkarli) समजताच स्थानिकांनी मदतकार्य सुरु केले. सुदैवाने 16 पर्यटक सुखरूप असल्याची माहिती आहे. सर्व पर्यटक पुणे आणि मुंबई येथील आहेत. बुडालेल्या बोटीचे नाव ‘जय गजानन’ असल्याची माहिती समोर येत आहे.

मंगळवारी दुपारी ही घटना घडली. यामुळे तारकर्ली येथील पर्यटकांमध्ये भितीचे वातवावरण निर्माण झाले आहे. हे सर्व पर्यटक स्कुबा डायव्हिंग करून परतत असताना हा अपघात झाला.

किनाऱ्यापासून काही अतंरावर असताना ही बोट बुडाली. यात दोघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. ही बोट कोणत्या कारणामुळे बुडाली हे अद्याप समजले नाही. हा अपघात झाला त्यावेळी येथे तैनात असलेल्या बचाव यंत्राणांनी तात्काळ बचाव कार्य सुरू सुरू केले आणि 18 पर्यटकांना वाचवण्यात त्यांना यश आले. मात्र यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.