देशभरात एकूण 81,938 तर महाराष्ट्रात 10,570 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर

0
WhatsApp Group

भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने संकलित केलेल्या माहितीनुसार देशभरात 31-3-2023 पर्यंत 81,938 पशुवैद्यकीय डॉक्टरांची नोंदणी झाली आहे. तर महाराष्ट्रात 10,570 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. देशभरातील पशुवैद्यकीय डॉक्टरांची राज्यनिहाय आकडेवारी सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये दिली आहे.

पशुसंवर्धन हा राज्यांच्या अधिकारक्षेत्रातील विषय आहे आणि सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भरती राज्यांकडून आजाराच्या महामारीविज्ञानाच्या स्थितीनुसार आणि प्राण्यांच्या परिस्थितीनुसार निर्माण होणाऱ्या गरजांच्या आधारे केली जाते. राज्याकंडून मिळालेल्या माहितीनुसार काही राज्यांमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या तुटवड्याचे प्रमाण बदलते आहे तर काही राज्यांमध्ये कोणताही तुटवडा नाही.

पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात डॉक्टर उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना करण्याचे राज्यांना अधिकार आहेत. राज्य सरकारांनी/ राज्य विद्यापीठांनी सुरू केलेल्या/ चालवण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयांना, पशुवैद्यकीय शिक्षणामध्ये उच्च गुणवत्ता टिकवण्याच्या उद्देशाने  केंद्र सरकारकडून भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने केलेल्या शिफारशींच्या आणि नियमांच्या आधारे मान्यता दिली जाते. तसेच भारतीय पशुवैद्यकीय परिषदेकडून शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी खाजगी महाविद्यालयांवर देखील नियंत्रण ठेवले जाते.

केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री परशोत्तम रुपाला यांनी आज लोकसभेत खासदार प्रीतम मुंढे यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.