
सीतामढीच्या पुनौरा धाम मंदिरात झालेला अनोखा विवाह चर्चेचा विषय ठरला आहे. येथे तीन फुटांच्या वराने साडेतीन फुटाच्या वधूला माळा घालून कायमचे आपले केले. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पुनौरा धाम येथे रविवारी रात्री झालेला विवाह लोकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
माता सीतेचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुनौरा धाम मंदिरात वधू-वरांच्या कुटुंबीयांनी मोठ्या थाटामाटात हा विवाह पार पाडला. वधू पूजा सीतामढी शहरातील मेला रोड, लोहिया नगर येथील रहिवासी आहे, तर वर योगेंद्र हा सीतामढी जिल्ह्यातील डुमरा ब्लॉकमधील रामपूर परोरी गावचा रहिवासी आहे. वधू पूजाचे वय 21 वर्षे आहे तर वराचे वय 25 वर्षे आहे. रविवारी सायंकाळी हा विवाह झाला.
बिहार की अनोखी जोड़ी: सीतामढ़ी की ये अनोखी शादी चर्चा में है..तीन फीट के दूल्हे को मिली तीन फीट की दुल्हनिया. पुनौरा धाम में हुई दोनों की खूब धूमधाम से शादी pic.twitter.com/lkMRBFYdPM
— Rajesh Kumar Ojha (@RajeshK_Ojha) November 21, 2022