
राज्यासह देशभरात सध्या नवरात्रीचा उत्सव मोठा जल्लोषात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी गरबा खेळत अनेकजण नवरात्रीचा आनंद घेत आहेत. अशातच नाशिकमध्ये नवरात्रीत गरबा खेळत असताना तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात गरबा खेळताना तरुणींच्या दोन गटात हाणामारी झाली.#Nashik #Igatpuri #Navratri #GarbaVideo #GirlFight #garbadance #ViralVideos pic.twitter.com/0L7Oev7xYi
— Inside Marathi (@InsideMarathi) October 4, 2022
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता तरुणींचे दोन गट एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नाशिक येथील इगतपुरी तालुक्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. येथे नवरात्रीचा उत्सवानिमित्त गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी तरुण-तरुणींसह थोर-मोठ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे.
व्हिडीओमध्ये चित्रपटातील गाणी सुद्धा ऐकू येत आहे. सर्व लोक गरबा खेळत आहेत. इतक्यात एक काळा टॉप परिधान केलेली तरुणी दुसऱ्या तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या तरुणीच्या अंगावर धावून जाते आणि केस ओढून तिला मारहाण करायला सुरूवात करते.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा