
मुंबई – राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या (Shivsena) गोटातील आणखी एक शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झाले आहेत. आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान, संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाल्यामुळे आता शिवसेनेकडे (Uddhav Thackeray) फक्त 15 आमदार उरले आहेत.
शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी सुद्धा आता बंड केलं आहे. तब्बल 13 दिवसानंतर बांगर बंड करत शिंदे गटात सहभागी झाले आहेत. बांगर यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या राजन साळवींना मतदान केलं होतं. आज मात्र, त्यांनी थेट शिंदे गटात उडी घेतल्यानमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.